कॉंग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीची नोटीस !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेसच्या पाच नेत्यांच्या विरोधात ईडीने नव्याने नोटीसा बजावल्या आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात तेलंगणामधील कॉंग्रेसच्या पाच नेत्यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावली आहे. या पाच नेत्यांना आज ईडीच्या दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या पाच नेत्यांमध्ये मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी, अंजन कुमार आणि गली अनिल यांचा समावेश आहे.

दरम्यान, . राहुल आणि सोनिया गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असताना या नेत्यांनी त्यासाठी देणगी दिली होती. याच प्रकरणाचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने या पाच नेत्यांना समन्स दिल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद वाढत असतांनाच दुसरीकडे त्यांच्या पक्षाच्या पाच नेत्यांना ईडीने बजावलेल्या नोटीसीच्या योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content