धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा स्वॅबचा अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात २८ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण २८ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. परिहार चौक-१, साठे नगर-३, मोठा माळीवाडा-१, धनगर गल्ली-१, अग्निहोत्रो-१, कुंभार वाडा-१,एमएसईबी कॉलनी-१, पाळधी खुर्द-७, पाळधी बुद्रुक-२, पिंप्री खुर्द-२, पिंपळे सीम-२, खपाट-१, पथराड-१, पिंपळकोठा-१, अंजनविहीरे येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. धरणगाव तालुक्यात एकुण रूग्ण संख्या ६५९ झाली असून यापैकी ३३ जणांचा मृत्यू तर ४७४ जण बरे होऊन घरी पाठविले आहे. तर उर्वरित १५२ जण उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.