मालेगावच्या मृत कोरोना पॉझिटीव्ह तरूणीचे जळगाव कनेक्शन !

जळगाव प्रतिनिधी । मालेगाव येथील तरूणीचा धुळे येथे कोरोनावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्यानंतर तिचा जळगावशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले असून प्रशासनाने या दृष्टीने तपासणी सुरू केली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी मूळची मालेगाव येथील रहिवाशी असणार्‍या तरूणीचा धुळे येथील रूग्णालयात मृत्यू झाला. ही तरूणी कोरोना पॉझिटीव्ह होती. धुळ्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी असल्याने खळबळ उडाली. दरम्यान, मृत्यूआधी ती तरूणी नेमकी कुणाच्या संपर्कात आली याची माहिती मिळवण्यात आली. यासाठी तिच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आले. यात ती तरूणी मृत्यूआधी धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणांसह जळगावातही येऊन गेल्याचे दिसून आले. यामुळे ती जळगावात नेमकी कुणाकडे आली होती याची माहिती मिळवून संबंधीतांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content