पारोळा तालुक्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या २५ जणांवर कारवाई

पारोळा प्रतिनिधी । कोरोना विषाणूंच्या प्रसार होऊ नये यासाठी देशात ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई करत विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्या टवळाखोर २५ जणांवर पारोळा पोलीसांनी कारवाई केली.

संचारबंदीच्या काळात दुचाकीने शहरात विनाकारण कोणत्याही ठिकाणी व आरडाओरड करण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. अत्यावश्यक सेवेसाठी फक्त गाड्यांचा वापर आणि पेट्रोल देण्यात येत असून सुद्धा टवाळखोर मुले मी दिवसभर रस्त्यावर मोटरसायकल घेऊन राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील बाजारपेठेत विनाकारण बघ्याची भूमिका घेऊन हिंडत असतात अशांवर टवाळखोरांवर पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक दातीर यांनी आपल्या साथीदारांसह स्वतः दुचाकीवर फिरणारी टवाळखोर मुलांविरुद्ध व नागरिकांन विरुद्ध दिनांक १० रोजी सायंकाळी सुमारे ७ ते ८ वाजेच्या दरम्यान २५ जणांविरुद्ध भा.द.वि.कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

Protected Content