देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात अपयश ; फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा


पॅरिस (वृत्तसंस्था)
कोरोनाच्या साथीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या फ्रान्सला आपण सावरू शकलो नाहीत म्हणून एडवर्ड फिलीप यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. गेली 3 वर्षं ते पंतप्रधानपदी होते.

 

कोरोना व्हायरसमुळे फ्रान्समध्ये २९८७५ लोकांचा बळी फ्रान्समध्ये गेला. कोरोनाचा फ्रान्समधला मृत्यूदर आतापर्यंत जगभरातला सर्वाधिक ठरला. कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येत १०० पैकी १७ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये मोठी दहशत पसरली आणि आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला देश ठप्प झाला. त्यामुळे अजूनही फ्रान्सला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडलेला नाही. या कारणाने एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला. तो राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या इम्युनेल मॅक्रॉन यांनी तातडीने स्वीकारला. पुढच्या काही तासांत मॅक्रॉन फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानांचे नाव घोषित करतील आणि पुढच्या 2 वर्षांसाठी फ्रान्सला आता नवा पंतप्रधान मिळेल.

Protected Content