पाकिस्तानात बस आणि रेल्वेचा अपघात ; गुरुद्वाराचे दर्शन घेऊन निघालेले २९ भाविक ठार

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) गुरुद्वाराचे दर्शन घेऊन निघालेल्या बस आणि रेल्वेच्या झालेल्या भीषण अपघात २९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या शेखापुरा येथील ननकाना साहबजवळ विना फाटक क्रॉसिंग लाईनजवळ हा अपघात झाला.

 

शाह हुसैन एक्सप्रेस कराचीहून लाहोरकडे जात असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पाकिस्तानच्या शेखापुरा येथील रेल्वे आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये पाकिस्तानमधील शीख भाविकांची संख्या अधिक असल्याची माहिती आहे. भाविकांनी भरलेल्या बसची शाह हुसैन एक्सप्रेस ट्रेनसोबत जोराची धडक झाली. यामध्ये जागेवरच १९ जणांचा मृत्यु झाला तर उपचारादरम्यान १० भाविक दगावले. आतापर्यंत मृतांची संख्या २९ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करुन मृतांना श्रद्धांजली वाहताना, मी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे खान यांनी म्हटले आहे.

Protected Content