जळगावातील प.वि.पाटील विद्यालयात पालक शिक्षक सभा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यालयात पालक शिक्षक सभा नुकतीच संपन्न झाली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जुन्या कार्यकारिणीच्या सदस्यांना या सभेला बोलावण्यात आले होते. जास्त पालकांना सभेला न बोलवता जुन्याच कार्यकारिणीच्या सदस्यांची निवड सदर समितीमध्ये करण्यात आली.

शाळा आगामी शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तक वितरण, ऑनलाईन शिक्षण, आरोग्य विषयक मार्गदर्शन, शाळा केंव्हा व कशा प्रकारे सुरू होतील याबद्दल मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी पालकांना आपल्या पाल्याचा घ्यावयाचा अभ्यास या विषयी मार्गदर्शन पर लेखाचे वाटप केले. प्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, पालक शिक्षक संघाचे चंदनसिंग परदेशी, सविता विसपुते, राधिका भावसार, संदीप सनानसे, सरला वंजाळे, आरती सोनार आदी उपस्थित होते.

Protected Content