भुसावळ, प्रतिनधी । देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची वर्तवली जात असतांना भुसावळ शहरातील काही कोविड सेंटर बंद करण्याची चर्चा होत असून ही कोविड सेंटर बंद करू नये अशी मागणी प्रा. धीरज पाटील यांनी आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असतांना राज्य शासन तयारीत आहे. कोरोना महामारीत कोरोना बाधितांना उपचार मिळावे यासाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरु केले होते. या सेंटरमुळे गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले. मात्र, मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड सेंटर बंद करण्यात आले. परतू, आता भुसावळ शहरातील कोविड रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना कोविड सेंटर बंद केल्यास असुविधा होऊन प्रशासनाची दमछाक होईल. भुसावळ हे कॉस्मोपॉलिटिन शहर आहे. शहरात रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे तसेच अत्यंत वर्दळीचा आशिया महामार्ग क्र. ४६ हि शहरातून जातो. आसपासच्या परिसरातील जनतेला वैद्यकीय सेवेसाठी भुसावळ चांगला पर्याय व आसरा आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील कोविड सेंटर कोरोनाची संभाव्य दुसऱ्या लाटेचे संकट टळल्या शिवाय कोविड सेंटर बंद करु नये अशी मागणी प्रा. धीरज पाटील यांनी केली आहे.