एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण

फैजपूर, ता. यावल निलेश पाटील । शहरातील धनाजी नाना कॉलेजच्या मागील बाजूस रहिवास असणार्‍या एकाच कुटुंबातील तिघे आज कोरोना बाधीत आढळून आले आहेत. या कुटुंबातील दाम्पत्याला आधी या विषाणूची बाधा झाली असून आता इतरांनाही याने ग्रासल्याचे दिसून आले आहे.

याबाबत वृत्त असे की, फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या मागील बाजूस पिंपरुड शिवारात राहणार्‍या एकाच कुटुंबातील तीन जणांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान याआधी याच कुटुंबातील दाम्पत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. परिणामी या एकाच कुटुंबातील बधितांची संख्या पाच आली आहे. दरम्यान शहरातील रथगल्ली भागातील डॉक्टर व त्यांचा पुत्र या दोघांना सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याची माहिती नाशिक येथून पालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. संबंधीत डॉक्टर पिता-पुत्र हे नाशिक येथे उपचार घेत आहेत. तर रथगल्ली भागातील त्यांचे निवासस्थानाच्या परिसराला सिल करण्यात आले असून निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे.

Protected Content