जाधव व महाजन यांची मनसेत घरवापसी

मुंबई प्रतिनिधी । माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेत आज पुन्हा प्रवेश केला आहे.

हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन हे आधी मनसेमध्ये होते. मात्र नंतर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज या दोन्ही मान्यवरांनी पुन्हा मनसेमध्ये प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असणार्‍या कृष्णकुंजमध्ये हा सोहळा पार पडला. याप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे आणि नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत प्रवेश केला.

घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षाने हिंदुत्वाचे वळण घेतल्यानंतरचा हा पहिलाच मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, आझाद मैदान येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होईल. या मोर्चाच्या आधीच पक्षात या मान्यवरांनी प्रवेश केला आहे.

Protected Content