…तर बच्चू कडू यांनी सरकारमधून बाहेर पडावे : सत्तार यांचा टोमणा

Abdul Sattar Aurangabad

मुंबई, वृत्तसंस्था | महाविकास आघाडी सरकारची दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीका इतर मंत्र्यांना झोंबल्याचे दिसत आहे. सरकारची कर्जमाफी बच्चू कडू यांना बुजगावणं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं, असा सल्ला राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी स्वतः सहभागी असलेल्या सरकारवरही ताशेरे ओढण्यात कसर सोडली नाही. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, ते अगणित आहे. त्यामुळे दोन लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी हे बुजगावणं असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते. पण कर्जमाफीचा हा पहिला टप्पा असून मराठवाडा, विदर्भातील ८० टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारकडे पैसा येईल तशी आणखी कर्जमाफी केली जाईल, असं उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.

Protected Content