सरकारला पूर्ण घेरण्याचे विरोधकांचे संकेत

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । विधानसभेचे विरोधी पक्षनेते   देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधीपक्ष म्हणून भाजपाने या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची संपूर्ण तयारी केल्याचे संकेत दिले.

 

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून काय तयारी केली आहे आणि नक्की कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न आहे यासंदर्भात उत्तरं दिली.

 

वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन मंत्री पदाचा राजीनामा दिला. राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली होती. त्यामुळेच आता राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.

 

याचसंदर्भात फडणवीस यांना या अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यांवरुन सरकारला प्रश्न विचारण्यात येतील असा प्रश्न अधिवेशनाच्या आधी पत्रकारांशी चर्चा करताना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी, “ वीज बिलांसाठी वीज करण्याची अशी मोहीम यापूर्वी महाराष्ट्रात घडली नाही. शेतकऱ्यांचे सामान्य माणसांचे, गावातील शहरातील वीज कनेक्शन कट करण्याचं काम सुरु आहे. ही मोगलाई आहे,” असं सांगत वीज बिलांचा प्रश्न यंदाच्या अधिवेशनात गाजणार असल्याचे संकेत दिलेत.पुढे  फडवीस यांनी, “शेतकऱ्यांना घोषित केलेले पैसे मिळाले नाही. अतिवृष्टीचे सर्वेक्षणं झालेली नाहीत, पीक विम्यासाठी एजन्सी नेमलेल्या नाहीत. मोठ्याप्रमाणात जी खरेदी झाली पाहिजे ती झाली नाहीय. या मुद्द्यांबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहोत,” असं फडणवीस म्हणाले.

 

Protected Content