शिवसेनेत अंतर्गत कलह; नगरसेवक अनंत जोशी यांचा मनपा गटनेतापदाचा राजीनामा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । महापालिका शिवसेना गटनेता तथा नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आपल्या गटनेतापदाचा राजीनामा आज शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे देणार आहेत. दरम्यान, महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांमधील अंतर्गत कलहातून आपण पदाचा राजीनामा देत आहोत, जेणे करून इतरांना देखील गटनेतापदासाठी संधी मिळेल, असे नगरसेवक अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नगरसेवक बंटी जोशी यांनी महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याशी भेट घेवून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  ते पुढे म्हणाले की, महापालिकेत भाजपा पक्षाचे महापौर भारती सोनवणे यांच्या वर्षभराच्या कामगिरीबद्दल विरोधात असलेले शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी आणि शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सत्कार करून कौतूक केले होते. महापालिकेत गटनेतेपदी अनंत जोशी व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पक्षाश्रेष्टींना सत्कारासंदर्भात कोणतीही परवानगी आणि विचारणा न करता भाजपाच्या महापौर भारती सोनवणे यांचा जाहीररित्या सत्कार केला. हा बाब शिवसेना पक्षाचे इतर नगरसेवक आणि पक्षश्रेष्टीच्या लक्षात आल्यानंतर नाराजीचा सुर उमटला होता. शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण झाला. सत्ताधारी भाजपासमोर शिवसेना नगरसेवकांनी नांग्या टाकल्याची  माहिती शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते यांचे कान भरविण्याचे काम अंतर्गत शिवसेना नगरसेवकांकडून होत आहे. चांगल्या कामासाठी आपण कोणाचेही कौतूक करतो. तो व्यक्ती आपल्या पक्षाचा असो व नसो, ही आपली भुमीका आपली होती असे अनंत जोशी यांनी सांगितली. आम्ही केलेल्या सत्कारामुळे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर व अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आपण महापालिकेत शिवसेना गटनेता म्हणून उत्तम काम केले आहे. चुकीचा मॅसेज वरिष्ठांपर्यंत पोहचल्यामुळे आपण आपल्या गटनेता पदाचा राजीनामा शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्याकडे सोपविला आहे.  अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/2891268914526006

 

Protected Content