जळगाव प्रतिनिधी | येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातर्फे जळगावात विविध भागात कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.
जिल्हा विधी प्राधिकरणाच्या निर्देशाने स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सावा अंतर्गत शहरातील विविध भागात कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातर्फे आज जळगाव शहरात गोलाणी मार्केट, बी. जे. मार्केट परिसरात जनजागृती करण्यात आली. यात प्रत्यक्ष नागरिकांना भेटून त्यांना विविध पत्रक वाटून कायदेविषयक माहिती देण्यात आली. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हासदादा पाटील आणि डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नयना झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती करण्यात आली. ही कायदेविषयक जनजागृती कांचन पद्माकर चौधरी, योगेश गोकुळ चौधरी, सुनील बाळकृष्ण चौधरी, देवेंद्र नांदेडे या विद्यार्थ्यांनी केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1215332015616145