गॅस सिलेंडर स्फोटातील कुटुंबाचे डॉ. केतकीताई पाटील यांनी केले सांत्वन

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  चोपडयाच्या दौऱ्‍यात डॉ. केतकीताई पाटील यांनी वटार गावात झालेल्या गॅस सिलींडर स्पोटातील कुटुंबाची भेट घेवून सात्वन केले.

 

नुकतेच वटार, ता.चोपडा येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन गावच्या सरपंच श्रीमती भिकुबाई सुभाष कोळी, कैलास भिका कोळी, पांडुरंग सुभाष ठाकरे,धनसिंग खंडू ठाकरे या चार कुटुंबीयावर खूप मोठा आघात झाला. या स्फोटात त्यांची घरे जळून नष्ट झाली यातच खूप मोठी वित्तहानी झाली, या दुर्दैवी घटनेने पूर्ण वटार गावावर आघात झाला असतांना या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी आज गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.सौ.केतकीताई पाटील यांनी चोपडा येथील दौऱ्‍यात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच या परिवाराचे सांत्वन केले आणि विचारपूस करत आरोग्यविषयी मदत करण्याचे आश्‍वासन देत मानसिक आधार दिला. यावेळी डॉक्टर केतकीताई पाटील यांच्यासोबत आरोग्यदूत जगदीश पाटील, उपसरपंच खुशाल पंढरीनाथ पाटील, माजी सरपंच बाळू दगडू ठाकरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content