श्री बालाजी शैक्षणिक संकुलात गुणगौरव सोहळा संपन्न

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री बालाजी विद्याप्रबोधनी मंडळ संचलित आप्पासो यू.एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय, डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालय तसेच एम. यू. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल आयोजीत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यू.एच. करोडपती होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील , पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर, संचालिका मंगला करोडपती, संचालक सुनील बडगुजर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवात दीपप्रज्वलन करून व श्री बालाजी स्तोत्राने झाली. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विजय बडगुजर यांनी सादर केले. तसेच बालाजी विद्याप्रबोधिनी मंडळाच्या वतीने माजी पालकमंत्री डॉ. सतीश बी पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष यु.एच करोडपती सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये घेतलेल्या एच एस सी व एस.एस.सी परीक्षा 2022 मध्ये तालुक्यात प्रथम आलेले तसेच विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस समारंभ माजी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात प्रामुख्याने पियुष पाटील यास सी.ई.टी मध्ये 99.89 % तसेच नीट मध्ये 537 मार्क मिळवल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. तालुक्यातून एच.एस .सी (इयत्ता 12 वी) प्रथम वैष्णवी सूर्यकांत चव्हाण व मयंक प्रशांत साळुंखे या दोघांनाही 85.33% गुण मिळाले . तसेच विद्यार्थी सृष्टी निलेश गुजराथी 85.17 %,मंथन सचिन बडगुजर 84.67% गुण मिळाल्याबद्दल तसेच एस.एस.सी (इयत्ता दहावी) परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या दिशा गणेश पाटील 97.20%, द्वितीय रोहित बाबुलाल चौधरी 96.40% , रितूल अतुल जैन 96.40 % विद्यार्थी तृतीय दिक्षिता राजेंद्र हजारे 96% गुण मिळाले. राज विश्वास चौधरी ९४ टक्के सौ एम यु करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी गौरवी मनोहर पाटील 96.60%, प्रणव सुरेश बागड 93 टक्के जय पंकज शिंपी 92.80% गुण मिळाल्याबद्दल देखील माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

गुणवंत व 90% च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी मनोगत पियुष पाटील, मंथन बडगुजर, गौरी पाटील, मयंक साळुंखे, साईप्रसाद राहुल मिसर, प्रणव सुरेश बागड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांमधून सौ. राधिका बडगुजर, हेमंत पाटील, यांनी आपले विचार मांडले प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास देवरे यांनी शिक्षणाचे महत्व व शिक्षण पद्धती यावर मार्गदर्शन केले. तर डॉ सतीश पाटील माजी पालकमंत्री यांनी खेळी मेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना चांगला वाईट गोष्टींचा जाणीव करून दिली आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून गुणवत्ता सोबत नैतिक मूल्य जोपासवी असा सल्ला देखील दिला आपण भाग्यवान आहात एक चांगल्या शाळेत आपण शिक्षण घेत आहात त्यांचे चीज करा असे ते म्हणाले. संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये यू. एच करोडपती यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.पाया पक्का असेल तर यश आपोआप मिळते त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. सर्वांनी मेहनत करायची तयारी ठेवा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली साळुंखे, दीपक जी भावसार , नितीन बडगुजर धर्मेंद्र शिंपी, यांनी केले तर संस्थेच्या वतीने सचिव डॉ. सचिन बडगुजर यांनी मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाच्या विद्यालयाचे तिन्ही मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

Protected Content