वेळापत्रकानुसारच होणार एमपीएससीची परीक्षा

मुंबई प्रतिनिधी । राज्यात विकएंडच्या लॉकडाऊनमुळे संभ्रमावस्था असतांना एमपीएससीची MPSC परिक्षा नियोजीत वेळापत्रकानुसारच होणार असल्याचा महत्वाचा निर्णय आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. पण आता ही परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

दरम्यान, एकीकडे MPSC राज्य लोकसेवा आयोगातर्फे ११ एप्रिल रोजीच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असतांना दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी या निर्णयाला विरोध देखील होऊ लागला आहे. पुण्यासह अनेक ठिकाणी हॉटस्पॉट बनले असल्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे.

Protected Content