भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची तालुका कार्यकारणी जाहीर

फैजपूर, प्रतिनिधी | भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात यावल तालुका युथ विंग अध्यक्षपदी साक्षी पाटील तर  उपाध्यक्षपदी प्रतीक वारके यांची  निवड जाहीर करण्यात आली.

 

प्रदेश अध्यक्ष तेजस पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल बाविस्कर यांच्या शिफारशीवरून राज्य अध्यक्ष प्रशांत गुरव व राज्य उपाध्यक्ष राहुल वाकलकर यांनी नियुक्ती पत्रके दिली. भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका युथ विंग अध्यक्ष – साक्षी पाटील, उपाध्यक्ष – प्रतीक वारके, मुख्य सचिव-विनोद कोल्हे, सचिव – डीगंबर चौधरी, सचिव- रोहन महाजन, सचिव – श्रेयस जैन, सचिव – जयमाला चौधरी, कोषाध्यक्ष – गौरव कोल्हे,  समन्वयक- पल्लवी तायडे, मुग्धा तळेले, नेहा पूनासे, दिनेश बारेला, निलेश बाक्षे, राहुल फुकटे, पौर्णिमा भंगाळे, जितेंद्र पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. मागील २ वर्षापासून भारतीय राष्ट्रीय युवा परिषद सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. तालुक्यातील युवकांना राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत काम करण्याची संधी मिळाली आहे त्याचे नक्की सोने करू असे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष साक्षी पाटील व टीम ने सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण खानदेशात प्रथमच एका तालुक्याचे प्रतिनिधित्व एक युवती करत आहे ही तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे.

 

Protected Content