चाळीसगावात पशुधनांना ‘लंपी स्कीन डिसीज’ आजार ठरतंय घातक !

चाळीसगाव, प्रतिनिधी |  शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून  ‘लंपी स्कीन डिसीज’ या आजाराने डोकेवर काढले असून काही जनावरे हे दगावले आहे. यामुळे ग्रामपंचायत, दुग्ध उत्पादक संस्थांनी एकत्रित येऊन जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहे.

 

चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ‘लंपी स्कीन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराने  थैमान घातले आहे. दरम्यान, हा आजार प्रामुख्याने गोवंश जनावरांत पहायला मिळत आहे. या आजारामुळे वीस पेक्षा जास्त जनावरे हे दगावली आहेत. या विषाणूवर कुठल्याही प्रकारचे औषधे उपलब्ध नसल्याने गोट फॉक्स हि लस त्यावर प्रभावी ठरली आहे. याअनुषंगाने वैद्यकीय रूग्णालय श्रेणी-२ पातोंडा अंतर्गत तालुक्यात प्रथम भामरे ब्रु. येथे लसीच्या ५ हजार डोस सेवा शुल्कातून घेण्यात आल्याने सदर ठिकाणी एकाच दिवशी ९० टक्के लस टोचून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आली आहे. यासाठी भामरे ब्रु. ग्रामपंचायतीकडून १० हजार रुपये व चार स्थानिक दुध उत्पादक संस्थांकडून १६ हजार रुपये असे एकूण २६ हजार रुपये निधी जमा झाल्याने गावात लसीकरण शिबिराचे आयोजन ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. तालुक्यात गो वर्गीय पशुधन हे एकूण ९७४९१ एवढे आहे. तत्पूर्वी या आजारामुळे नाकाच्या व तोंडाच्या आतील भागांमध्ये गाठी, ग्रंथीला व मागुल पायांना सुज येणे तसेच इतरही प्रकारचे लक्षणे आढळून येतात. यामुळे बाधीत गावाने भामरे ब्रु गावाचे बोध घेत उपखेड व पातोंडा याठिकाणी लसीकरणाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर उर्वरित जणावरांच्या लसीकरणासाठी ग्रामपंचायतीने गावातील दुध उत्पादक संस्था व लोकसहभागातून अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहेत.

 

Protected Content