जळगाव प्रतिनिधी । मराठा सेवा संघासह विविध सामाजिक संस्थांतर्फे फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
आज सर्वत्र शिवराज्यभिषेक दिन मोठ्या चैतन्यदायी वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने ठिकठिकाणी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून मराठा इतिहासातील मानाचे पान असणार्या या तेजस्वी अध्यायाचे स्मरण केले जात आहे. जळगावात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जोरदार जयघोष केला. याप्रसंगी महापालिकेचे शिक्षण सभापती सचिन पाटील, उद्योजक डी. डी. बच्छाव, किरण बच्छाव, सुरेंद्र पाटील, राम पवार, उदय पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.