ईडीच्या पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह ; दिल्लीतील मुख्यालय सील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रचंड खळबळ उडालीय. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

 

ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांमधील संशयितांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे शुक्रवारी ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला. भारत इटलीला मागे सोडून करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ रुग्णांना करोनाची बाधा झाली होती. भारतात हीच संख्या दोन लाख ३६ हजार ११७ आहे. दरम्यान, भारतात शुक्रवारी ४,८३३ रुग्णांसह एकूण १,१२,३१८ रुग्ण बरे झाले. ही संख्या एकूण रुग्णांच्या ४९.३ टक्के आहे. १५ दिवसांपूर्वी हा दर ४२ टक्के होता.

Protected Content