फैजपुरात रंगणार तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तिसरे लेवागणबोली साहित्य संमेलन मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात होणार असून याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

आज धनाजी नाना महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, प्राचार्य पी. आर. चौधरी, प्रभात चौधरी व तुषार वाघुळदे यांची उपस्थिती होती. यात तिसर्‍या लेवा गणबोली संमेलनाबाबत माहिती देण्यात आली. तिसरे लेवा गणबोली साहित्य मंडळ जळगाव व मधुस्नेह संस्था परिवार यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे. संमेलन फैजपूर येथे होत आहे याला खुप महत्व आहे. फैजपूरची भूमी थेर राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्यसैनिकांच्या पदस्पशनि पवित्र झालेली आहे तर या भूमीत कवी कैशवसु्त, बा. सी. मर्ढेकर, श्रीराम अत्तरदे, कवी भानू चौधरी, डॉ. श. रा. राणे यांचे या भूमीत वास्तव्य होते. १७ जानेवारी रोजी कवयित्री कसुमताई चौधरी यांची जयंती
सुद्धा आहे. त्यामुळे साहित्य संमेलन स्थळाला ’कवयित्री कुसुमताई चौधरी साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे.

संमेलनाध्यक्ष पदावर जळगाव येथील लेवा गणबोली साहित्यीक अरविंद कुष्णा नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी लेवा गणबोलीत कथा, नाटयछटा असे विपूल लेखन केलेले आहे. ते भादली हायस्कूलचे सेवानिवृत मुख्याध्यापक आहेत. संमेलनाचा प्रारंभ साहित्यिक व कवी प्राध्यापक भानू चौधरी यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथदिडीने होईल. त्यानंतर उदघाटन सत्र होईल. उदघाटन परतवाड़ा कॉलेजचे प्राचार्य व भाषा शास्त्राचे अभ्यासक डॉ. काशिनाथ बर्‍हाटे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

संमेलनाचे आयोजक मंडळाचे सचिव तुषार वाधुळदे तर कार्याध्यक्ष प्रभात चौधरी असुन इतिहासकार, जेष्ठ भाषातज्ञ डॉ. नि. रा. पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. संमेलनात तीन चर्चोसत्रे होणार असून यासोबत प्रकट मुलाखत, नाट्यछटा सादरीकरण व लेवा गणबोलीतील तसेच मराठी कवी संमेलन होणार आहे. संमेलनाचे बहताशी काम लेवा गणबोलीतच व्हावे असा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रमोद चौंधरी, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रभात चौधरी, आयोजक तुषार वाघुळ्दे, आयोजन समिती सदस्य किशोरी वाघुळदे, संजय पाटील,लिलाधर कोल्हे, डॉ. विनय पाटील, प्रा संध्या महाजन, ज्योती राणे, सुवर्णलता पाटील (डोबिवली), वीणा नारखेडे तसेच फैजपुर कॉलेजचे प्राध्यापक व कार्यकर्त कार्यरत आहेत. समेलनासाठी लेवा गणबोलीत लेखन करणारे साहित्यिक प्राध्यापक कवी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या बोलीत विविध क्षेत्रात कार्यरित व उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या काही व्यक्तिमत्वांचा विशेष गौरवही या संमेलनात होईल.

लेवा गणबोली ही गोड व लहेजायुक्त भाषा आहे. बहिणाबाईच्या कवितामुळे भारताच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार गेली आहे. मधुस्नेह परिवार नेहमीच सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात सहभागी होतो. या संमेलनात साहित्यिक मंडळींसह साहित्य प्रेमी, अभ्यासक आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

Protected Content