तिकिट वडिलांना. . .अर्ज भरला मुलाने ! : तांबे यांचे धक्कातंत्र

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी ऐन वेळेस डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या धक्कातंत्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कॉंग्रेसतर्फे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. ते आज अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर देखील करण्यात आले होते. तथापि, आज त्यांचे पुत्र तथा युवक कॉंग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांच्या विरोधात भाजपने उमेदवार देखील जाहीर केलेला नाही. यामुळे या ठिकाणी कॉंग्रेस आणि भाजपची हातमिळवणी असल्याचे चित्र दिसून आले आहे. तर डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेऊन आपल्या मुलाचा मार्ग मोकळा केल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. ता सत्यजीत तांबे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी कॉंग्रेसचाच उमेदवार आहे. तरीही भाजपची मदत मिळावी म्हणून मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करणार आहे. आपली राजकीय परंपरा प्रगल्भ आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या जागा आपल्याकडे बिनविरोध होतात. त्यामुळे भाजपची मदत मिळेल, असं तांबे म्हणाले

Protected Content