पाचोऱ्यात रयत सेनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील स्वामी लॉन्स येथे रयत सेनेच्या वतीने १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे महाराज यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अठरापगड जातींच्या सवंगडयांना सोबत घेत जुलुमी मोगल शाहीला उखडून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची होती. ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि या देशाला दोन छत्रपती दिले. अशा महान राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंतीनिमित्त पाचोरा येथे रयत सेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी रयत सेनेचे तालुका अध्यक्ष रमाकांत पवार, शहराध्यक्ष रामा जठार, शहर उपाध्यक्ष साहेबराव तडवी, सचिव चंद्रकांत दत्तू, प्रवीण महाराज, यांच्यासह स्वामी लॉन्सचे संचालक प्रकाश सोनार, दत्ता सोनार उपस्थित होते.

Protected Content