शहरात वेगवेगळ्या घरफोडीतील गुन्हेगारास अटक; एमआयडीसीत गुन्हा

जळगाव प्रतिनिधी ।  खिडकीची जाळी तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याची दागिने व रोख लंपास केल्याची घटना मेहरुण परिसरातील गणेशपुरी प्लॉटमध्ये १६ ऑक्टोंबर रोजी घडली होती. याप्रकरणी सराईत गुन्हेगार रईसखान हमीदखान उर्फ लाला (वय २५) रा. गणेशपुरी याला एमआयडीसी पोलिसांनी ३० मार्च रोजी रात्री अटक केली.

शहरातील मेहरुण परिसरातील गणेशपुरी प्लॉट परिसरातील हारुन मुसा पटेल (वय ६०) यांच्या घरात १० ऑक्टोंबर २०२० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने वरच्या मजल्यावरील रुमच्या खिडकीची जाळी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात असलेल्या कपाटातील २५ हजारांची पोत, २० हजाराच्या दोन अंगठ्या व २० हजारांची रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी एमअयाडीसी  पोलिसात गुन्हा दाखल करणयात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी रईसखान हमीदखान उर्फ लाला (वय २५) रा गणेशपुरी मास्टरकॉलनी हा फरार होता. पोलिसांनी त्याला ३० मार्च रोजी सायंकाळी ६.३२ वाजता अटक केली. लाला हा सराईत गुन्हेगार असून त्याचयाविरुद्ध शहरातील पोलीस ठाण्यांसह भुसावळ रेल्वेपोलिसात जबरी गुन्हे दाखल असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यात आहे. संशयित आरोपी  रईसखान हमीदखान उर्फ लाला याला आज न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Protected Content