Home Cities जळगाव रविवारी आ. भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

रविवारी आ. भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

0
41

जळगाव, प्रतिनिधी ।  आ. राजूमामा भोळे यांचा वाढदिवस भाजपा जिल्हा महानगरतर्फे शहरातील ३६५ बूथवर वृक्षारोपण करून साजरा  केला जाणार आहे. 

भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष व जळगाव शहराचे आमदार राजूमामा  भोळे  यांचा  रविवार १३ जून  रोजी ५६ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने महानगरातील ९ मंडलांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात वृक्षारोपण, नेत्रतपासणी असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.  महानगरातील ९ मंडळांमध्ये सप्ताहभरात ३६५ बुथवर वृक्षारोपण करण्याचा संकल्प भाजपा जिल्हा महानगरच्या वतीने करण्यात आला असून से जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमांची सुरवात ९ मंडळात करण्यात आला आहे.  महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पानाचा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता महाराणा प्रताप चौक, बहिणाबाई उद्यान येथे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भागत बालानी व जिल्हापादाधिकारी व नगरसेवक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार  असल्याचे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे व जिल्हाप्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

 


Protected Content

Play sound