चाळीसगावात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना चाळीसगाव शहरात  विना मास्क फिरणाऱ्यांची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे २७ विना मास्क  फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकतीच टाळेबंदी उठवली. याच गोष्टीचा फायदा घेत शहरात विना मास्क  फिरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विना मास्क  फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने एकूण २७ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून यातून ४,८०० रूपये वसूली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बांधीतांची संख्या आटोक्यात येत असल्याने कारवाईचा बडगा हा थंडावला होता. मात्र टाळेबंदी उठवताच अनेक जण बिनधास्त होऊन विना मास्कचे आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू नये म्हणून वेळीच दक्षता घेऊन हि कारवाई करण्यात आली. हि कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पवन पाटील, सभा शेख, प्रकाश पाटील व होमगार्ड तसेच नगरपालिका कर्मचारी निलेश पाटील व शिंदे आदींनी केली.

 

Protected Content