चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकी सरस्वती पॅनलच वर्चस्व

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील नामांकित शैक्षणिक संस्था चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षीक निवडणूकीत सरस्वती पॅनलने वर्चस्व सिध्द करून झेंडा रोवला आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये गणल्या जाणाऱ्या चिनावल येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीत सरस्वती पॅनलचे १३ पैकी ६ बिनविरोध तर रविवारी  झालेल्या निवडणुकीत ५ जण निवडून येत दणदणीत विजय मिळवून विरोधी गटाला दोन सदस्यांवर समाधान मानावे लागले आहे.

 

रविवार २४ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत सरस्वती पॅनलचे अध्यक्षपदी श्रीकांत सिताराम सरोदे ( २२५ मते ) घेऊन तर सचिवपदी गोपाळ देवचद पाटील ( २३१ मते ) घेत विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. तर निवडणूकी आधीच सरस्वती पॅनलचे उपाध्यक्षपदी राजेंद्र वामन फालक, पेट्रन गटात किशोर भिवसन बोरोले, राजेंद्र मुरलीधर पाटील, डोनर गटात विनायक कमलाकर महाजन, सुरेश गिरधर गारसे, दामोदर यादव महाजन हे विजयी झाले होते. आजच्या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव व सर्वसाधारण गटातील अनिल सुधाकर किरगे, खेमचद गोवर्धन पाटील, मनोहर विठ्ठल पाटील हे सरस्वती पॅनलचे उमेदवार निवडून आले. तर विरोधी गटातील फेलो कॅटगिरीत दामोदर गणपत भंगाळे व निळकंठ भोजराज चौधरी हे विजयी झाले.

 

या निवडणूकीत ४१० सभासदांपैकी ३६९ सभासदांनी मतदान केले. यावेळी नूतन संचालक मंडळाने संस्थेच्या प्रगतिसाठी कटीबद्ध असल्याची भावना व्यक्त केली. निवडणूक संस्थेचे स्व. वाय. एस. पाटील सभागृहात होवून लागलीच मतमोजणी करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी मुख्याध्यापक एच. आर. ठाकरे, सहा.निवडणूक अधिकारी पी. एम. जावळे, सी. एम. भारंबे, गिरीश नारखेडे, रोशन होले यांचेसह नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. निवडणूक यशस्वी व नियोजन बद्ध पद्धतीने पार पडल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांचे व निवडून आलेल्या सर्व संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Protected Content