मयत होमगार्ड यांच्या कुटुबियास आर्थिक मदत

सावदा, ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील होमगार्ड प्रकाश गोपाळ भालेराव यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना सावदा होमगार्ड युनिट तसेच सावदा पोलीस स्टेशनमार्फत आर्थिक मदत करण्यात आली.

सावदा होमगार्ड युनिटमध्ये कार्यरत प्रकाश भालेराव यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार द्यावा. या उद्देशाने सावदा होमगार्ड युनिटतर्फे १६,००० रुपयाची तर सावदा पोलीस स्टेशनमार्फत ३१,००० रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली.

सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि देविदास इंगोले ,पोलीस उप निरीक्षक समाधान गायकवाड, होमगार्ड प्रभारी अधिकारी दिपक खाचणे, निलेश खाचणे, प्रकाश साफकर, अनिल तडवी, विनोद मतले यांची उपस्थिती होती. या वेळी मयत प्रकाश भालेराव यांच्या पत्नी व मुलाने हि मदत स्विकारली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.