शिवरायनगरमधील हल्ल्याप्रकरणी दंगेखोरांना तात्काळ अटक करा; रहिवाशांची मागणी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरुणीच्या आक्षेपार्ह पोष्ट व महीलांद्वारा मारहाण प्रकरणाला काही समाज कंटकांनी धार्मिक रंग दिल्याने १५० ते २०० जमावाचे माथी भडकावून शिवराय नगर या भागात दहशत माजविली याप्रकरणी दंगेखोरांना तात्काळ अटक करा; अशी मागणी रहिवाशांनी करत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना निवेदन दिले आहे.  

शिवराय नगर प्रभाग क्र १२ मधील कोणत्याही व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध नसताना हिंदू वस्तीत बेकायदेशीर जमावाने तलवारी, लाठ्या काठ्या, सळई, रॉड, ज्वलनशील साहित्य हातात घेवून काही घरांची नासधूस केली. काहींनी दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोडसह घरांवर दगडफेक केली. शिवीगाळ करत दहशत माजविली.

सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये या दंगेखोरांचे ‘कारनामे कैद झाले आहेत. शहरातील व आमच्या प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्यासाठी दंगेखोर व याचे मास्टरमाईंड यांना तात्काळ अटक करा. अशा मागणीचे लेखी निवेदन शिवराय नगरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना दिले असून यासाठी ३ दिवसात मागणी मान्य झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदन देतेवेळी कल्पना पालवे, सरिता कोळी, यशोदा माळी, बेबाबाई इंगळे, अनिता मराठे, रेखा कदम, विमलबाई सोनार, संगीता श्रीखंडे, शकुंतला भोई, सुरेखा माळी, ज्योती मालचे यांचेसह नगरसेवक संतोष मराठे, सचिन (पिंटू) पाटील, दीपक पवार, स्वप्नील श्रीखंडे, भावेश बिरारी, अक्षय सोनार, कृष्णा मोहोड, सागर सनांसे, किरण महाजन, अनुज मनोज पालवे, विनीत माळी, राहुल सनांसे, किरण मिस्तरी, विशाल गोसावी, चेतन कांडेलकर, निलेश लवांडे, तुषार सोनार, गणेश भोजने आदींसह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

Protected Content