फळांची रोपे वाटून वडिलांचा वाढदिवस केला साजरा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बृहन्मुंबई महानगर पालिकेत उद्यान अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले नगरदेवळ्याचे भूमिपुत्र जितेंद्र परदेशी यांनी आपले वडील विठ्ठलसिंग गोकुळसिंग परदेशी यांचा ८५ वा वाढदिवस गावात १ हजार ५०० फळझाडांची रोपे वाटून साजरा केला.

त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, सरपंचपती किरण काटकर, मुस्लिम सोसायटीचे चेअरमन गनीशेठ, अध्यक्ष विनोद परदेशी उपस्थित होते.

‘निसर्गाचा समतोल साधण्यासाठी असे वाढदिवस साजरे करून प्रत्येकाने एक झाड जगवावे.’ असे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी आपल्या मनोगतात सांगितले आणि उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तहसिलदार कैलास चावडे यांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील व आपल्या पुराणातील अभ्यासपूर्ण माहिती देत उपस्थितांना वृक्षसंवर्धन करणे किती आवश्यक आहे ते उदाहरणासह पटवून दिले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थितांचा व सत्कारमूर्ती विठ्ठलसिंग परदेशी यांचा शाल, श्रीफळ व फळझाड देवून सत्कार क्षत्रिय परदेशी समाजाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, गावातील विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ तोष्णीवाल यांनी तर उपस्थितांचे आभार पुंडलिक कोळी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदीप परदेशी, शैलेंद्रसिंग परदेशी, सुनिल परदेशी, प्रकाश परदेशी, महेंद्र परदेशी, अरविंद परदेशी, कपिल परदेशी, रुपेश परदेशी, दिपक बैरागी, प्रज्योत परदेशी, बबलू परदेशी सर्व क्षत्रिय परदेशी समाजाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Protected Content