चांदवड, प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुर कासलीवाल यांनी स्वखर्चाने ३०० कुटुंबासाठी आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधी शहर परिसरात वाटण्यात आल्या.
सध्याच्या कोरोना कोविड परिस्थितीत सर्वच ठिकाणी आर्सेनिक ३० या औषधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मार्केटमध्ये सध्या आर्सेनिक ३० औषध चढ्यादराने विक्री सुरू असूनसुद्धा अर्निका होमिओपॅथीचे डॉ. राकेश वाघ यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कमी दरात औषध उपलब्ध करून दिले. त्यानुसार अंकुर कासलीवाल, यशोदीप घमंडी,रत्नदीप बच्छाव यांनी सदर औषधांचे वाटप प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय,नगरपरिषद चांदवड कार्यालय ,पोलीस स्टेशन तसेच अनेक कुटुंबाना वाटप केले. अजूनही २०० कुटुंबाना उपलब्धतेनुसार औषध स्वखर्चाने वाटप करणार असल्याचे श्री. कासलीवाल यांनी सांगितले.