शिरसाड येथील आधार फाऊंडेशनतर्फे आदिवासी पाड्यावर जावून साडी व फराळ देवून दिवाळी साजरी

 

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील शिरसाड येथील ग्रामपंचायत सदस्य तथा यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील यांच्या आधार फाऊंडेशनतर्फे गावाजवळील आदीवासी पाड्यावर महिलांना साडी व फराळ देवून दिवाळी साजरी करण्यात आली.

शिरसाड गावाला लागून असलेल्या २-३ पाड्यावर जाऊन हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिरसाड येथील ज्येष्ठ नागरिक प्रताप नाना पाटील, पांडुरंग काका मराठे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश काका सोनवणे, वासुदेव सोनवणे, ज्ञानेश्वर दादा सोनवणे, डीगू महाजन, प्रभाकर जाधव, विष्णु भाऊ सोनवणे, किशोर बडगुजर, बापू पाटील, दीपक दादा खंबायत, किशोर इंगळे, आबा ठाकूर, राहुल भालेराव, विकास दादा वाघ, विशाल भाऊ इंगळे, श्रीकृष्णभाऊ शिरोळे, लीलाधर धनगर, विकास अटवाल, सागर सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

तेजस पाटील नेहमी सामाजिक कार्याद्वारे विविध उपक्रम राबवित असतात. यावर्षी दिवाळीच्या दिवशी त्यांनी गावातील सर्व ग्रामदैवतांची पूजा करून गावातील सर्व कष्टकरी, शेतकरी, युवा वर्ग, महिला वर्ग व संपूर्ण गावकऱ्यांना सुख-समृध्दी लाभो अशी प्रार्थना केली.

Protected Content