गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेचा वापर विवेक बुद्धीने आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ऊर्जा संवर्धनाबाबत जागरूक केले जाते आणि भविष्यातील ऊर्जेच्या गरजे बाबत माहिती दिली जाते. तसेच या दिवसाच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचे मोठे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्नही केला जातो. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (खखउ) अंतर्गत १४ डिसेंबर २०२२ रोजी ऊर्जा संरक्षण बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रा. अतुल बर्‍हाटे (विद्युत विभाग प्रमुख) वक्ता म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता) प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख) तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे वक्ता प्रा. अतुल बर्‍हाटे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाबद्दल माहिती देताना सांगितले की ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ही एक घटनात्मक संस्था आहे जी भारत सरकार अंतर्गत काम करते. आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी धोरणे व धोरणात्मक गोष्टी विकसित करण्यास मदत करते. तसेच त्यांनी ऊर्जा संवर्धन म्हणजे काय हे समर्पक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळणे आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे जेणेकरून भविष्यातील वापरासाठी ऊर्जेचे स्त्रोत वाचवता येईल. ऊर्जा संवर्धन योजना अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वर्तनात ऊर्जा संवर्धनाचा समावेश केला पाहिजे.तसेच त्यांनी ऊर्जा संवर्धनासाठी चे उपाय सांगितले. जीवाश्म इंधन, कच्चे तेल व नैसर्गिक वायू इत्यादी मधून दैनंदिन वापरण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होत आहे, परंतु त्यांची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा अभाव होण्याची भीती निर्माण झाली आहे, म्हणून त्यासाठी अक्षय ऊर्जा संसाधनाचा वापर केला पाहिजे.सदर कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. अतुल बर्‍हाटे यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सर्वेश चौधरी या विद्यार्थ्याने केले.

Protected Content