जिल्हा पोलीस मुख्यालयात शांतता कमिटीची बैठक

जळगाव प्रतिनिधी । त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत काही संघटनांनी काढलेल्या मोर्चात दगडफेक केल्याने हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे डॉ. प्रविण मुंढे यांनी आज शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी अनुचित प्रकार होणार नाही असे आश्वासन सदस्य, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी दिले आहे.

जिल्हा पेालीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे रविवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. जळगाव शहरात सर्व सण उत्सव जळगावातील सर्व समाजबांधव एकत्रीपणे साजरा करत आहे. त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात काहीही अनुचित प्रकार घडणार नाही. शहरात शांतता अबाधीत रहणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी देखील प्रयत्नशील राहतील अशी आमदार राजूमामा भोळे आणि महापौर जयश्री महाजन यांनी आश्वासन दिले.

सोमवारी श्रीराम मंदीराचा रथ काढला जाणार आहे. त्यामुळे यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यंदा रथ सकाळी निघाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या आत रथ पुन्हा मंदिराजवळ पोहोचवण्याचे नियोजन आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे असे पाटील यांनी सांगीतले. तर सन १९७० पासून नियाज अली यांनी सुरु केलेली प्रथा जोपासली जाणार आहे, असे सांगितले.

जातीय सलोखा जोपासला जाईल याची काळजी घ्यावी, अनुचित प्रकार होणार नाही याची जबाबदारी सर्वांची जबाबदारी आहे. आणि सोशल मिडीयातून परवल्या जाणाऱ्या जातीय द्वेष, अफवा यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सांगीतले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे उपमहापौर कुलभुषण पाटील, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, अयाज अली, सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, शांतता कमिटीचे सदस्य, विविध समाजबांधव, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content