पुढील रविवारी इको फ्रेंडली गणपती सजावट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी  ।  लेवा सखी घे भरारी  आणि सकल लेवा  समाज मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार  दि. २९ ऑगस्ट रोजी  इको फ्रेंडली गणपतीची सजावट करू या !  या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

१० वर्षांवरील  बालकांसाठी व सर्व वयोगटातील भगिनिंसाठी लेवा सखी घे भरारी आणि सकल लेवा समाज मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने चला निसर्गाच्या सादला प्रतिसाद देऊ या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून शाडूमाती पासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावर्षी बाप्पासाठी इकोफ्रेंडली डेकोरेशन बनवायला भरत प्रल्हाद चौधरी व त्यांची टीम कडून शिकविले जाणार आहे. या  डेकोरेशन बनविण्यासाठी लागणारे साहित्यासाठी  १५० रुपये फी आकारण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर कांताई सभागृह समोरील विश्व मंगल योग निसर्गोपचार केंद्र येथे रविवार २९ ऑगस्ट रोजीसकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. अधिक माहितीसाठी अॅड. भारती ढाके, ९४२२२९६६०८,डॉ. निलम किनगे ७७२१०२८८९५,  भारती चौधरी ८४५९९३९३९६, चित्रा महाजन ९४२३१८५९८१ असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Protected Content