राज्यस्तरीय वॉटर पोलो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा मुलींचा संघ तृतीय स्थानी

c48fc935 6e0f 4036 b3b3 10c0c9fbb6e7

 

जळगाव (प्रतिनिधी) स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने सब ज्युनियर व जुनियर राज्यस्तरीय जलतरण वॉटर पोलो अजिंक्यपद स्पर्धा २०१९ बालेवाडी क्रीडा संकुल जलतरण तलाव पुणे येथे दिनांक ३१ मे ते २ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्विमिंग स्पर्धेत जळगाव जिल्हा जलतरण असोसिएशनचा वॉटर पोलो मुलींचा संघ तृतीय स्थानी राहिला.

या संघात गौतमी चेतन सिंग देवरे, रुजुल अनिल शिरसाळे, लाजरी विजय खाचणे, जीविका रंजीत मराठे, डिंपल विनायक चौधरी, रिद्धी कमलेश नगरकर, (सर्व पोलीस जलतरण तलाव) हिमांशी किरण पाटील व जानव्ही शिवाजी पाटील (एकलव्य जलतरण तलाव) सहभागी होत्या. खेळाडूंना वॉटर पोलो या खेळासाठी कमलेश नगरकर व अखिलेश यादव यांचे प्रशिक्षण लाभले त्यांच्या या यशाबद्दल जिंदा चे अध्यक्ष तथा के के कॅन्स यांचे संचालक रजनीकांत कोठारी व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रेवती नगरकर, सचिव फारुक शेख यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले विजयी संघाचे अभिनंदन उपाध्यक्ष राजेंद्र किशोर नेवे, ईश्वर खंदार, रमेश सोनवणे, एकलव्य जलतरण तलाव चे श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले.

Add Comment

Protected Content