जळगावातील ऑटो गॅरेज फोडले; न्यू बी.जे.मार्केटमधील घटना

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बी.जे.मार्केटमधील ऑटो गॅरेजचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून दोन बॅटऱ्यासह इतर सामांनाची चोरी झाल्याचे आज उघडकीस आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

दुकानदाराकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नवीन भिकमचंद जैन मार्केटमधील दुकान नंबर १९४, विजय ऑटो गॅरेजचे बंद दुकानाचे शटराचे दोन कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत दुकानातील इन्व्हर्टरच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्या. दुकान मालक शेख अफजल शेख अकबर रा. टागोर नगर यांचे मालकीचे आहे. शेख अफजल यांचे लहान भाऊ शेख ताहेर शेख अकबर हे दुकान उघडण्यासाठी सकाळी ९ वाजता दुकानावर आले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसून आले. दुकानात सामानाची पाहणी केली असता दुकानातील दोन इर्न्व्हरटरच्या बॅटऱ्या लंपास केल्याचे दिसून आले. दरम्यान, शेख अफजल यांनी चोरी झाल्याची तक्रार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. अद्याप पोलिसांत चोरीची कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content