गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात फ्रेशर पार्टी उत्साहात   

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसंच सीनियर्सची ओळख व्हावी यासाठी फ्रेशर पार्टीचे आयोजन केले जाते.

याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या फ्रेशर पार्टीचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा.ईश्वर जाधव ( रजिस्ट्रार), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) डॉ .नितीन भोळे (प्रमुख,बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटी), प्रा.अतुल बर्‍हाटे (विद्युत विभाग प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी(संगणक विभाग प्रमुख) महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सादर करावी, जेणेकरून तुमच्या व्यक्तीमत्वात प्रगल्भता येईल. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परस्पर संबंध व सर्वांगीण विकास वाढतो. तसेच या संपूर्ण दिवसभर चालणार्‍या कार्यक्रमामध्ये सर्वांनी हिरीरीने सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घ्या असे आवाहन केले.

याप्रसंगी डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अशा प्रकारचे कार्यक्रम नियमित राबविण्या बद्दल सांगितले. दिवसभराच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांचे सुप्तगुण, आत्मविश्वास तसेच त्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी या पद्धतीने वेगवेगळ्या राऊंड्सचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यत: पहील्या फेरी मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या इेुश्र मधून चिठ्ठी काढून त्यात दिलेले टास्क पूर्ण करायचे होते. फिश बाऊल या फेरीत पहिल्या वर्षाच्या सर्व मुला- मुलींनी अतिशय आनंदाने सहभाग नोंदवला. दुसर्‍या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रॅम्प वॉक करून काही प्रश्नांची उत्तरे देऊन आपले शारीरीक तसेच बौध्दीक कौशल्य दाखवायचे होते. त्यानंतर अंतिम फेरी मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना अवगत असलेली कला सादर करायची होती. त्यानंतर डान्स, गीतगायन, मिमिक्री अश्या वेगवेगळ्या कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या सर्व फेर्‍यांमधून मिस्टर व मिस फ्रेशर्सची निवड करण्यात आली यात मिस्टर फ्रेशर्स म्हणून कुणाल धनगर व मिस फ्रेशर म्हणून वर्षा कोकणे हे विजेते ठरले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, कोनिका पाटील, माधुरी निकम, प्रज्वल पाटील, दिपाली खोडके, चेतश्री बोरसे, विशाल बोंडे, प्रशांत पाटील, स्नेहा वडनेरे, गायत्री चौधरी, गायत्री माळी, गणेशराज पाटील या सर्व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रो. तृषाली शिंपी, प्रो. भावना झांबरे, प्रो. पंकज बोंडे, प्रो .हर्षल चौधरी यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमावेळी परीक्षक म्हणून प्रो. दिपाली पाटील, प्रो. हरीश पाटील, प्रो. आर .व्ही .पाटील, प्रो. जयश्री पाटील, प्रो. शुभांगी तायडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच डॉ. नितीन भोळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने व उत्साहानेसहभाग नोंदवला व भरघोस प्रतिसाद दिला.

Protected Content