यावल येथील विद्यार्थ्यांची बॉक्सींग स्पर्धेत निवड

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील महाविद्यालयाने विभागातील जळगाव विभागांतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत यश प्राप्त केले. बॉक्सिंग स्पर्धेत साळवे पवन (वजन घट ४६ते ४० किलोग्रॅम), व संकेत तायडे (वजन घट ४८ ते ५१ किलोग्रॅम) यांची निवड विद्यापीठ स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

सदर बॉक्सिंग स्पर्धा महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) येथे २ ते १० जानेवारी २०२३ रोजी बॉक्सिंग स्पर्धा घेतली जाणार आहे. या विद्यापिठ पातळीवरच्या स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. ए.पी. पाटील, प्रा. एम.डी. खैरनार, प्रा. संजय पाटील, क्रीडा सहाय्यक डॉ. पी.व्ही. पावरा, मिलिंद बोरघडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वागत करून अभिनंदन केले.

Protected Content