दक्षता नगरातील राहणाऱ्या तरूणाच्या घरावर दगडफेक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील दक्षता नगरात राहणाऱ्या एका तरुणाच्या घरावर अज्ञात दोन जणांनी दगडफेक करून खिडकीचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात दोन जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील दक्षता नगरात चंद्रशेखर दामोदर सुरंगे (वय-३५, रा. दक्षता नगर बिल्डिंग नंबर ४, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत असतो. २१ डिसेंबर रोजी पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात दोन जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये घराचे दोन खिडक्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान दगडफेक करण्याचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. यासंदर्भात चंद्रशेखर सुरंगे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

Protected Content