जयश्री महाजन शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार !

Jayshree Sunil Mahajan जळगाव प्रतिनिधी । एकीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील काही नगरसेवक हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने आज सौ. जयश्री सुनील महाजन यांना महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना मतदान करण्याचे व्हिप देखील पक्षाच्या नगरसेवकांना जारी करण्यात आले आहेत.

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या आधीच जळगावच्या राजकारणात भूकंप उघडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील अनेक नगरसेवकांनी शिवसेनेशी संधान बांधले असून ते शहरातून गायब झाले असल्याची चर्चा दुपारपासून सुरू आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सूचकपणे १८ मार्च रोजी सगळे काही समोर येईल असे सांगितले. यामुळे आता जळगाव मध्ये सत्तांतर होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान एकीकडे सत्तांतराची चर्चा सुरू असताना आज शिवसेनेने जयश्री सुनील महाजन यांना महापौर पदाची उमेदवारी जाहीर केली. आज दुपारी शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यासंदर्भात शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना व्हीप देखील बजावण्यात आले. या बैठकीला माजी महापौर नितीन लढ्ढा, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे, महानगराध्यक्ष शरद तायडे, इब्राहिम पटेल, प्रशांत नाईक, नितीन सपके, चेतन शिरसाळे आदींची उपस्थिती होती.

Protected Content