अवैध धंद्यांविरुध्द धामणगाव बढेचे सरपंच , उपसरपंचानेही कसली कंबर

 

धामणगाव बढे : प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव , नियमांची पायमल्ली करीत अवैध  धंदे  वाढून व्यसनाधीन झालेल्या तरुणांना व्यसनमुक्तीसह योग्य दिशा देण्यासाठी सरपंच महिलेचे पती शे.अलीम कुरेशी व उपसरपंच श्यामराव निमखेडे यांनी पुढाकार घेतला आहे

 

धामाणगाव बढेसह परिसरात अवैध मटका , चक्री, पत्याचा जुगार, अवैध गुटखा  व्यापार बिनबोभाट बोकाळला आहे  हे अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत  सरपंच, पती   शे.अलीम कुरेशी, उपसरपंच श्याम निमखेडे यांनी  धामणगाव बढे पोलीस ठाण्यात  लेखी पत्र दिले आहे

 

जिल्ह्यात  कोरोना साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात  असुन याचे परिणाम सर्वत्र  दिसत  आहेत  लॉकडाउनच्या हलाखीत अनेकांचे आर्थिक व्यवहार डबघाईस आले  नागरिकांचे आर्थिक जिवन संकटात आहे या  संकटात अनेक दुकानदार  व्यवसाय बंद ठेउन जिल्हा प्रशासनास सहकार्य करीत आहे

परंतु स्थानिक पोलिस प्रशासनाचे कृपा अशिर्वादाने अवैध  मटका,चक्री ,गुटका ,पत्याचा जुगार चालविणारांना याचे  कोणतेही सोयरसुतक नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला पायदळी तुडवत  अवैध धंदे खुलेआम  सुरु  आहेत , असे या पात्रात नमूद करण्यात आले आहे

 

हे अवैध व्यवसाय  कोरोना संसर्गाच्या  वाढीचेही कारण ठरत आहेत    वैध व्यवसायाना नियमाने बंदी तर अवैध  खुलेआम  सुरु अशी उलटी तऱ्हा  झाली आहे ! . जणू राजाश्रय असल्यासारखे हे अवैध धंदे चालवणारे लोक कुणालाच जुमानत नाहीत . १३ मार्चरोजी  पोलिसांना हे निवेदन देण्यात आले .

 

गावासह परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन मागील एक वर्षापासुन  जनता आर्थिक संकटात सापडली आहे  अनेक कुटुंबातील तरुण व्यसनाधीन होत आपले भविष्य भरकटुन टाकत आहे या करीता व्यसनमुक्त तरुण  व व्यसनमुक्त गाव घडवण्यासाठी माझे प्रयत्न आहे , असे शेख अलीम कुरेशी यांनी सांगितले

 

 

धामणगाव बढे हे  आदर्श गाव व्हावे व आजचा युवा गावाचे  भवितव्य असल्याने  वाईट प्रवृत्ती,  विकृत विचारापासुन तरुणांना रोखण्याचा आमचा खटाटोप आहे  उद्दात विचार तरुणात रुजवण्याचा मनाचा निर्धार आहे , असे उपसरपंच श्यामराव निमखेडे यांनी सांगितले

Protected Content