गॅस ग्राहकांना मोफत सिलेंडर द्या : लाल बावटा शेत मजूर युनियनची मागणी

चोपडा, प्रतिनिधी । केंद्र सरकारने कोरोना साथ काळात लॉक डाऊन करतांना एप्रिल ते जून २०२० या काळासाठी फक्त उज्वला गॅस योजना अंतर्गत मोफत गॅस भरून देण्याचे जाहीर केले आहे. त्याचा लाभ फक्त उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्यांनाच मिळेल अशी वार्ता नागल वाडी.. विर्वाडा ..चौगाव गावात पसरल्याने शेतमजुर लाभार्थी यांचेत असंतोष पसरला आहे.

याबाबत सविस्तर असे की, चौगाव येथे वनखात्यातर्फे गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत. तर नागलवाडी येथे काही लोकांनी इंडेंन कंपनीचां खाजगी गॅस एजंट मार्फत ५०००/ ५००० रु भरून घेतला आहे. त्यात दारिद्र्य रेषेखालील, दलीत, आदिवासी, इतर शेतमजुर यांचा समावेश आहे. त्यांना मोफत गॅस दिला जाणार नाही हे कळल्याने या लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. या गावातील इंडेन कंपनीच गॅसधारक १५-२० लोकांनी २०१६ पासून सिलेंडर व गॅस घेतले आहेत. पण त्यांना आजमितीपावेतो गॅसची सबसिडीच मिळाली नसल्याची तक्रार आहे. गॅस संपला की एजेंट येतो त्याला ९७५ रु दिले की तो घरपोच सिलेंडर आणून देतो. आता कोरोना साथ काळात देखील सिलेंडर भरण्यासाठी ९७५रुपयेच द्यावे लागतात. तसेच चौगावं येथे वनविभागातर्फे ज्यांना गॅस वाटप झालेला आहे त्यांनाही हा लाभ दिला जाणार नाही. वीर वाडे येथे तर उज्ज्वला गॅस ग्राहक जिजाबाई भीमराव शिरसाठ यांच्याकडून व इतरांकडून ७५४ रु एजेंट ने आगाऊ जमा कारणे चालू केले आहे. व सबीसीडी नंतर मिळेल असे सांगितले जात आहे. कोरोंना साथ काळात लोक घरात बसून आहेत काम धंदा नाही. कुठून आणतील पैसे ?असाही प्रश्न आहे. एकूण या व इतर कंपन्यामार्फत गॅस कनेक्शन घेणाऱ्या सर्वांना उज्ज्वला योजनेचा लाभ. सबसीडी.. आताचे काळात मोफत गॅस भरून द्यावेत या सर्व ग्राहकांची सर्व समावेशक यादी ग्रामपंचायत कडे द्यावी त्यात भेदाभेद नको अनयथा या ग्राहकांवर अन्याय विरुध्द लोक दाननंत र आंदोलन छेडले जाईल.. असा इशारा लाल बावटा शेतमजुर युनियनचे नेते कॉ. अमृत महाजन, छोटू पाटील, शांताराम पाटील, हिराबाई सोनवणे, जिजाबाई शिरसाठ, राजेंद्र पाटील, छायाबाई वाघ, वर्षाबाई पाटील, लताबाई पाटील, कमलबाई पाटील, तुळसाबाई पाटील आदींनी दिला आहे..

Protected Content