Home आरोग्य धरणगाव येथे तिरुपती युवा मंडळातर्फे रक्तदान शिबिर

धरणगाव येथे तिरुपती युवा मंडळातर्फे रक्तदान शिबिर

0
49


धरणगाव, प्रतिनिधी । येथील तिरुपती युवा मंडळ भाटीया गल्ली धरणगाव यांच्यातर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रक्तपेढीत रक्त साठाचा तुटवडा जाणवू लागल्याने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर घेण्यात आले.

कोरना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला असून रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठा कमी पडू लागल्याने आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेडक्रॉस यांच्यातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी साडेआठ ते एक वाजेपर्यंत ५१ जणांनी रक्तदान केले. यावेळी मास्क लावून व सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन करण्यात येत आहे. या शिबिरास तरुणांचा उत्फुर्त सहभाग मिळत आहे.


Protected Content

Play sound