सावदा येथे आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतली आढावा बैठक

सावदा, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील सावदा येथे काल एक ६० वर्षीय महिला व वय ५५ वर्षीय पुरुष असे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर रुग्ण सापडलेला भाग प्रशासन सील केला असून, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेऊन विविध सूचना दिल्यात.

सावदा येथील शासकीय विश्रामगृहावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांतअधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, बी.डी.ओ सोनिया नाकोडे, तालुका आरोग्य अधिकारी तथा नोडल ऑफिसर डॉ. एन. डी. महाजन व डॉ. शिवराज पाटील, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, सपोनी. राहुल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता शेख, उप अभियंता बाविस्कर, नगरसेवक राजेश वानखेडे, फिरोज खान हबीबुल्ला खान, नायब तहसीलदार मनोज खारे, तलाठी ईश्वर कोळी, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, फिरोज खान आब्दार खान, श्याम पाटील, तसेच शरद भारंबे, भरत नेहेते आदी उपस्थित होते. याबैठकीत आ. चंद्रकांत पाटील यांनी शहरातील परिस्थितीची तसेच मुक्ताईनगर मतदार संघातील तालुक्यातील गावांचा आढावा घेतला. यात त्यांनी सांगितले की, शहरातील दुकानांवर नागरिकांची गर्दी करू नये. अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. शहरातील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन केले. याबाबत सपोनि राहुल वाघ यांना सूचना करण्यात आले आहेत. तर मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना देखील शहरातील व्यवस्था ठेवण्याबाबत, मास्क नसलेल्या नागरिकांवर कारवाई तसेच अत्यावश्यक सेवेच्या दुकानावर जर कोण मास्क नसलेला नागरिक आला तर त्याला वस्तू द्यायची नाही असे दुकानादारास समज द्यावी. फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कारावी असें सांगण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुरेसे पीपीई किट उपलब्ध नसलेबाबत सांगितल्यावर आमदार पाटील यांनी त्वरित जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पीपीइ किट उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले.
यानंतर आमदार पाटील यांनी रुग्ण सापडलेल्या भागातील परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले फिजीकल डिस्टन्ससिंग पाळा, विनाकारण घराबाहेर जाऊ नका, बिनामास्क फिरू नये. प्रशासनास सहकार्य करा, व आपण सर्व मिळून या कोरोना संकटावर मात करू असे सांगितले. तर पोलिस, न,पा, कर्मचारी, पत्रकार यांना देखील आपण मास्क, व सॅनिटायझर देऊ असे देखील यावेळी सांगितले. तर आज दि. २० रोजी सायंकाळी ६ वा शहरातील डॉक्टर यांची एक मींटिंग तसेच सायंकाळी ६.३० वा शहरातील ट्रान्सपोर्ट चालकांची देखील बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी प्रांतअधिकारी डॉ. अजीत थोरबोले, हे मार्गदर्शन करणार आहेत.

Protected Content