Home क्राईम गुरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक

गुरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक

0
40


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातून गुरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

जामनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ ते जामनेर रोडवर असलेल्या मराठी शाळेजवळून एका वाहनात ३ गायी, १ वासरू आणि एक गोऱ्हा यांना दोरीने घट्ट बांधून निर्दयीपणे  वाहतूक करताना आढळून आले. या संदर्भात काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी वाहन तातडीने थांबविले. यासंदर्भात विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान वाहन पकडून नागरिकांनी जामनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जामनेर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन कोंबून भरलेले गुरांना सोडविण्यात आले. या संदर्भात सुभाष अजून पवार या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेरू मोहम्मद हुसेन कुरेशी (वय-२६), आणि नितीन राजेश पाटील (वय-२९) दोन्ही रा. सिल्लोड जि. संभाजीनगर यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयेंद्र पगारे करीत आहे.


Protected Content

Play sound