Home Cities अमळनेर महाविद्यालयाचे कार्यालय फोडून कम्प्युटरसह सामानांची चोरी

महाविद्यालयाचे कार्यालय फोडून कम्प्युटरसह सामानांची चोरी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामधील कार्यालय फोडून कॅम्पुटरसह इतर सामानांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरापासूनजवळ असलेल्या ढेकू शिवारात माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालय आहे. ६ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान महाविद्यालय बंद असताना अज्ञात चोरट्याने महाविद्यालयाचे कार्यालयाचे लोखंडी ग्रील तोडून कम्प्युटरसह इतर सामानांची चोरी केली. तसेच कार्यालयातील फोटो खुर्ची, सोफा तोडून नुकसान केले. या संदर्भात शनिवारी ८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य कुणाल राजेंद्र पाटील (वय-३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जे.डी. पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound