Home क्राईम किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करून दुचाकी पेटवली

किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करून दुचाकी पेटवली

0
45

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील सुप्रीम कॉलनी येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला लोखंडी सुराने वार करून गंभीर जखमी केले, तर त्याची दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत आसिफ खान यासीन खान (वय-२५) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या गल्लीत राहणारे तारीख पटेल आणि इमरान खाटीक व रेहान खाटीक यांचा वाद सुरू होता. त्यावेळी आसिफ खान याने विचारले की, ‘काय झाले’ असे विचारल्याचा राग आल्याने इम्रान अजिज खाटीक, रेहान इमरान खाटीक, रईस गुलाब पटेल आणि जुनेद गुलाब पटेल सर्व रा. सुप्रीम कॉलनी जळगाव यांनी आसिफ खान याला बेदम मारहाण केली. तसेच घरातून लोखंडी सुरा आणून त्याच्या हातावर वार केले. शिवाय मध्यरात्री त्याची दुचाकी (एमएच १९ डीएस ७९६९) वर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून देऊन नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर शनिवारी ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आसिफ खान याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी इमरान अजिज खाटीक, रेहान इम्रान खाटीक, रईस गुलाब पटेल आणि जुनेद गुलाब पटेल या चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound