जळगाव प्रतिनिधी । शहरात अभूतपुर्व कचराकोंडी झाली असून सत्ताधारी व विरोधक यासाठी आक्रमक झालेले आहेत. एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील होतांना दिसत आहेत. मात्र महापालिका निवडणुकीत सत्ताधार्यांचा चेहरा आणि नेतृत्व असणारे माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे मात्र गायब असल्याने जळगावकरांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे,बंटी जोशी,विष्णू भंगाळे,शरद तायडे यांच्यासह इतर काही सर्वपक्षीय नगरसेवक कचर्याच्या मुद्द्यावरून वॉटर ग्रेस कंपनीसह महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध काही दिवसापासून लढा देताय. अगदी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आंदोलनं देखील करताय. पण दुसरीकडे जळगाव महापालिकेत सत्ता दिली तर १०० दिवसात चेहरा मोहरा बदलवू, कामं केली नाहीत तर विधानसभेला मत मागायला येणार नाही, अशी भलीमोठी फेका-फेकी करून निवडणूक जिंकणारे माजी मंत्री गिरीश महाजन मात्र, सध्या जळगावकरांना वार्यावर सोडून गायब आहेत.
जळगाव शहरातील कचर्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काही दिवसात स्थानिक नगरसेवकांसह आता गिरीश महाजन यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनं करतांना दिसली तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही. मुळात गिरीशभाऊ यांनी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी येऊन भाषणं करून जळगावकरांना गंडवले असून आता त्यांनी हात वर केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सत्ता गेल्यापासून टांगा पलटी, घोडे फरार अशी स्थिती जळगावात दिसतेय. तर दुसरीकडे महापालिकेतील विजयाचा सर्वात आधी महापौरपदासह विधानसभेत ज्यांनी फायदा घेतला, असे राजूमामा भोळे विधानसभेत बोलतात, मात्र स्थानिक पातळीवर प्रशासनासोबत एक आमदार म्हणून कचर्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी धावपळ करतांना दिसून येत नाहीत.
गिरीशभाऊ…जर तुम्हाला शहराचा चेहरा मोहरा बदलावयाचा नव्हता, तर जळगावकरांना खोटी आश्वासनं का दिली? तुमची नैतिक जबाबदारी आहे की, तुम्ही जळगावात निवडणुकीच्या वेळी जसे ठाण मांडून बसले होते, त्याच पद्धतीने जळगाव शहर किमान कचरा मुक्त होत नाही, तोपर्यंत जळगावातच थांबा. नगरसेवक कैलास सोनवणे यांना मदत करा. तुम्ही तुमच्याच पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकेतील पदाधिकार्यांना असे वार्यावर सोडू शकत नाही. जर तुम्हाला हे काम जमत नसेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, तुम्ही यापुढे जळगावकरांकडे मुळीच मतं मागायला येऊ नका अशी भावना लोक व्यक्त करत आहेत. सध्या जळगावकरांची अवस्था ‘आलीया भोगाशी…असावे सादर’.. अशी झाली असल्याचे कुणाला नाकारता येणार नाही.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news